उद्धव ठाकरेंना हिंदुत्वा शिवाय पर्याय नाही हे समजलं का .. ? शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून पक्ष फुटणे हे काही नवीन नाही सहा खासदार फुटण्या अगोदरही तीन वेळा मोठ्या प्रमाणावर पक्ष फुटलेला आहे , एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार फोडत मुख्यमंत्री झाले माध्यमांसमोर त्यांनी केवळ एकच भूमिका मांडली उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरून अ जीवन विरोध करणाऱ्या काँग्रेसला साथ दिली आणि सरकार स्थापन केले. याचमुळे मूळ शिवसैनिकाच्या व शिवसेनेच्या विचाराला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार फोडले त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना अवघे 18 आमदार निवडून आणता आले आणि एकनाथ शिंदे यांचे 66 आमदार निवडून आले या निकालावरून खऱ्या शिवसैनिकाचं मतदान हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने पडलं हे सिद्ध झालं. शिवसैनिकाला व शिवसेनेच्या मतदाराला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व कडवट हिंदुत्वाची भूमिका नेहमीच पटत आलेली आहे आणि याच मूळ विचार झालेला उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिल्याने अनेक निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंकडे व भारतीय जनता पक्षाकडे गेल्याचे चित्र दिसत आहे . आता नुकतंच उद्धव ठाकरेंचे सहा खासदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि विकास कामांसाठी भरघोस निधी मिळणार आहे व तसेच उद्धव ठाकरे पुन्हा एकदा काँग्रेस सोबत जाणार असल्याची गोष्ट सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला . एवढी मोठी पक्ष फुटी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षविरुद्ध भाजप मुक्त राम हे आंदोलन पुकारला आहे उद्धव ठाकरेंकडे असणारा कार्यकर्ता एकत्रित करून रामरक्षा म्हणायची आणि जय श्रीराम ची घोषणा द्यायची अशी त्यांनी सुरुवात केली. यावरून असा अंदाज नक्कीच बांधता येतो की उद्धव ठाकरेंना हे आता कळून चुकलं आहे की शिवसेना म्हणजे कडवट हिंदुत्ववादी विचार स्वीकारणारा व्यक्ती आणि जर पुन्हा त्या लोकांना एकत्रित करून स्वतःच्या पक्षामागे भली मोठी फौज कार्यकर्त्यांची आणि मतदारांची उभी करायची असेल तर हिंदुत्व शिवाय पर्याय नाही हे त्यांनी स्वीकारला आहे असं म्हणायला हरकत नाही तसेच देशाचं राजकारण बघता आणि जनतेचा कौल बघता येणारे काही वर्ष देशाची केंद्रीय सत्ता ही उजव्या विचारसरणीच्या लोकांकडेच जाऊ शकते आणि यामध्ये मुख्यत्व भारतीय जनता पक्ष सत्तेत राहू शकतो याचा त्यांना अंदाज नक्की आला आहे त्यामुळे भूतकाळात झालेली चूक सुधारण्यासाठी वर्तमान काळात सुरू केलेलं राम बचाव आंदोलन आणि पुन्हा हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणे या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा स्वतःचा पक्ष वाढविण्यासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे हे चित्र दिसत आहे .