सायबर फसवणुकीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष जनजागृती अभियान सुरू केले आहे. बँक तपशील, ओटीपी आणि संशयास्पद लिंक शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाळा, महाविद्यालये आणि व्यापारी संघटनांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. तक्रारीसाठी राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनचा वापर करण्याचेही आवाहन आहे.





