राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी पंप वीजजोडणी, लघु सिंचन आणि पीक विमा दाव्यांच्या प्रक्रियेतील विलंब कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
या निर्णयाचे अंमलबजावणी आदेश पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी निधी वितरण पारदर्शक ठेवण्याची मागणी केली आहे.



